स्टोरी

बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी!

Spread the love

सावंतवाडी: बांदा येथिल प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या सोहळ्याला भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून श्री विठुरायाचे दर्शऩ घेतले.मंदिरात पहाटे पाच वाजता काकडआरतीने मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात हा सोहळा आरंभ झाला. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी वाजतगाजत उत्सवमुर्तीचे आगमन झाले. या सोहळ्यानिमित्त अनेक वर्षांची परंपरा असलेल्या निगुडे येथिल दिंडी सह निमजगा दिंडी ,ऱामभरोसे मंडळ देऊळवाडा दिंडी ,उभाबाजार दिंडी,त्याचप्रमाणेनाबर स्कूल बांदा व जि.प. केंद्रशाळा बांदा,तसेच तोरसे येथिल महिलांची दिंडी अशा अनेक दिंड्या मंदिरात येतात. आलेल्या सर्व दिंड्यांचे मंदिरातर्फे स्वागत करण्यात आले. सात वाजता सायंआरती झाली. प्रतिवर्षाप्रमाणे रात्री श्रींच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व रोषणाई कऱण्यात आली होती.


Spread the love

Related posts

काश्मीरमध्ये हिंदू नरसंहार चालूच; आता बंगालची वाटचालही काश्मीरच्या दिशेने !

news

जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गने साजरा केला जागतिक महिला दिन.

प्रसाद परब

सद्‌गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचे मंगळवार १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा दरबाल हॉल येथे आगमन होणार.

news

Leave a Comment