स्टोरी

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शिवडी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश!

Spread the love

२८ जून वार्ता: शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात सामना मुखपत्रातून बदनामीकारक खोटी बातमी केल्याप्रकरणी शेवाळेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या अर्जावर मुंबईतील शिवडी न्यायालयानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना समन्स बजावत १४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

२९ डिसेंबर २०२२ रोजी सामना या मुखपत्राच्या हिंदी आणि मराठी आवृत्तीमध्ये प्रकाशित एका लेखात राहुल शेवाळे यांचे दुबई तसेच पाकिस्तानातील कराचीत रिअल इस्टेटमध्ये हितसंबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर शेवाळे यांनी वकील चित्रा साळुंखे यांच्या मार्फत ३ जानेवारी २०२३ रोजी नोटीस पाठवून या लेखातील दाव्यांचा स्त्रोत काय? अशी विचारणा केली होती. त्यावर, एका महिलेने इंटरनेटवर केलेला दावा आणि अन्य माहितीच्या आधारावर हा लेख लिहील्याचं सामनाकडून प्रत्युत्तरात देण्यात आलं. या उत्तरानंतर खासदार राहुल शेवाळेंनी दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही दाखल केला आहे.

दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे, पोलिसांनी शेवाळेंना बोलावून त्यांचा जबाबही नोंदवला आहे. ‘सामना‘मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सादर केला आहे.


Spread the love

Related posts

शाळेमध्‍ये तंबाखू, मद्य सेवन केल्‍यास त्‍वरित कारवाई !शालेय शिक्षण विभागाचा निर्णय!

news

मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींवर कारवाई न होणे, हा न्यायालयाचा अवमान!

news

आडवली समर्थ गड येथे १० एप्रिल पासून स्वामी समर्थ जयंती उत्सव!

news

Leave a Comment