क्राईम

कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात सापडली स्फोटके!

Spread the love

कर्नाटक: राज्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली. यात ६ सहस्र डिटोनेटर्स आणि २ सहस्र ८०० जिलेटिनच्या कांड्या यांचा समावेश आहे. वाहन तपासणी करतांना पोलिसांना महंमद मुस्तफा याच्या वाहनात ही स्फोटके सापडली. त्याला कह्यात घेऊन त्याच्या घरी धाड घातली असता तिथे आणखी स्फोटके सापडली. पोलिसांनी मुस्ताफाला अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी मुस्ताफाला त्याच्या घरी नेल्यावर तो न्हाणीघरात गेला आणि तिथून बाहेर आलाच नाही. पोलिसांनी दार तोडल्यावर त्याने त्याचा हात कापण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तत्परतेने त्याला जिल्हा चिकित्सालयात भरती केले. मुस्तफाच्या चौकशीत तो कर्नाटकमधील खाण मालकाला पुरवण्यासाठी ही स्फोटके संग्रहित करत असल्याचे त्याने सांगितले.


Spread the love

Related posts

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर देवगड येथे बेकायदा बंदूका बाळगल्या प्रकरणी दोघांवर दाखल.

news

ठाणे येथील काँग्रेसच्‍या विद्यार्थी संघटनेच्‍या शहर अध्‍यक्षासह ५ जणांविरोधात गुन्‍हा नोंद !

news

चित्रीकरणातील कृती प्रशिक्षणाचा भाग नाही! एन्.सी.सी. ठाणे प्रकरण.

news

Leave a Comment