शिक्षण

मसुरे केंद्र शाळेचे डी सी ए परीक्षेत घवघवीत यश…चार विद्यार्थी जिल्हा गुणवंत यादीत

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): डॉट काॅम असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय DCA परीक्षेत केंद्रशाळा मसुरे नं.१ चे चार विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. या परीक्षेत दुसरी ते सातवी मधून एकूण ३२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होवून १००% निकाल लागला.

गुणवत्ता यादीतील विद्यार्थी पुढीलप्रमाणे- १) स्वानंदी दर्शन हिंदळेकर (२री) – जिल्ह्यात अकरावी, २) मिहिर शैलेश मसुरकर (२री) – जिल्ह्यात अकरावा, ३) यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (६वी) – जिल्ह्यात प्रथम, ४) श्रेया प्रदीप मगर (७वी) – जिल्ह्यात तृतीय. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका शर्वरी सावंत ,गुरुनाथ ताम्हणकर, श्रीमती मगर मॅडम, श्री गावडे सर, श्री विनोद सातार्डेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे शाळा समिती,केंद्रप्रमुख देशमुख सर आणि पालकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

पळसंब सुपुत्र तुकाराम साटम यांचे सिए परीक्षेत यश..!

news

अल्पसंख्यांकांसाठी सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणार: शालेय शिक्षण मंत्री केसरकर

news

महाडी पंचायत समितीचे अतिरिक्त शिक्षकांचे नियमबाह्य समायोजन..! गटशिक्षणाधिकारी यांचा मनमर्जी कारभार.

प्रसाद परब

Leave a Comment