स्टोरी

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघातर्फे विविध १ मे रोजी आझाद मैदानावर बेमुदत साखळी उपोषण

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर महासंघातर्फे विविध मागण्यासाठी १ मे रोजी आझाद मैदान येथे बेमुदत साखळी उपोषण धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.गेली अनेक वर्ष या महिला परिचर विविध मागण्यांसाठी शासनाकडे संघर्ष करत आहेत. १ मे पासून मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदतसाखळी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या विद्या कुडाळकर, साक्षी आचरेकर, भारती पवार,राजश्री पेडणेकर, शुभांगी पवार आदी उपस्थित होते .मानधन वाढ मिळावी ,नियमित सेवेत कायम करावे, अंशकालीन नावात बदल करावे, रिक्त पदांवर वारसदारांना प्राधान्य देण्यात यावे, दरवर्षी गणवेश व भाऊबीज यासाठी २ हजार रुपये देण्यात यावे दर महिन्याला ५ तारिखाच्या आत मानधन अदा करावे या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


Spread the love

Related posts

तोरणागडाच्या (पुणे) तटबंदीखाली ३ शिवकालीन गुहा सापडल्या!

news

मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या पाठपुराव्यामुळेच न्हावेलीतील पाणि प्रश्न मार्गी…!

news

दिव्यांग बांधवांना तहसीलदार कार्यालयाकडून सर्व ती मदत दिली जाईल…! तहसीलदार श्रीधर पाटील

प्रसाद परब

Leave a Comment