स्टोरी

दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी संदीप देसाई!

Spread the love

सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुका पत्रकार समितीची निवडणूक आज गुरुवार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी दोडामार्ग येथे झाली. दोडामार्ग तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्ष पदासाठी सुहास देसाई विरुद्ध संदीप देसाई व पराग गावकर या तिघांमध्ये हि निवडणूक झाली. दोडामार्ग तालुका पत्रकार समिती निवडणुकीत संदीप देसाई यांना बहुमत मिळाले. दोडामार्ग तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी संदीप देसाई, उपाध्यक्षपदी साबाजी सावंत, शंकर जाधव, सचिवपदी गणपत डांगी, खजिनदारपदी रत्नदीप गवस यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी तेजस देसाई, समीर ठाकूर, राजेश देसाई लवु खरवत, प्रभाकर धुरी भिकाजी गवस आधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकार म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार एडवोकेट संतोष सावंत यांनी काम पाहिले.


Spread the love

Related posts

मसुरे कावावाडी येथील तीन घरांवर वडी हे महाकाय जंगली झाड कोसळून लाखोंचे नुकसान.

news

खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल.

news

आरोंदा गावात शिवकालीन वस्तुंचे भव्य प्रदर्शनास सावंतवाडी तालुका मनसेने दिली भेट.

news

Leave a Comment