Uncategorized

देव्या सूर्याजी यांचे आंदोलन स्थगित; मागण्यांवर लेखी आश्वासन.

Spread the love

सावंतवाडी, ता. १६( संतोष परब): केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांची ओपीडी सावंतवाडीत सुरू करण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी विशेष सभा घेऊन संस्थानच्या अटी मान्य करण्याचा ठराव मंजूर करून पाठविण्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी नगरसेवक देव्या सूर्याजी यांना दिले. इतर मागण्यांवरही लेखी आश्वासन मिळाल्याने त्यांचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.सुमारे ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या कामाचे तृतीय पक्ष तांत्रिक लेखापरीक्षण करण्यात येणार असून, अहवाल येईपर्यंत ठेकेदार जगताप याचे पुढील काम स्थगित ठेवण्यात येणार आहे. काम बोगस आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.पाणीपुरवठा विभागातील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नगरसेवक देव्या सूर्याजी व दोन आंदोलनकर्त्यांची समिती नेमून विशेष सभेत अहवाल सादर केला जाणार असून दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई करण्याचेही आश्वासन देण्यात आले.मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली. चंदगड येथील मुख्याधिकारी ८ ते १० दिवसांत सावंतवाडीत रुजू होतील, अशी ग्वाही देण्यात आली.लेखी आश्वासनांची तातडीने पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सूर्याजी यांनी दिला. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कलंबिस्त येथील पूल दुरुस्तीसाठी महिन्याभराच्या आत निधी देण्याचे दिपक केसरकरांचे आश्वासन…..

news

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे विचार आचरणात आणा! दीपक भोगटे यांचे प्रतिपादन.

राजदत्त वेटे यांना महाउद्योजक रत्नदिप पुरस्कार प्रदान.

news

Leave a Comment