क्राईम

बांदा पोलिसांची अवैद्य दारू वाहतूक विरोधात मोठी कारवाई..! तब्बल ९ लाख ४७ हजार २४० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त.

Spread the love

बांदा: गुरुवारी दुपारी सुमारे २.१५ वा.च्या सुमारास बांदा चेकपोस्ट येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोवा राज्यातून होणाऱ्या अवैद्य दारू वाहतूक विरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमित नाकाबंदी सुरू असताना पोलिसांनी एका बोलेरो पिकअपची तपासणी केली असता या गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत एकूण ९ लाख ४७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमोल लक्ष्मण चिंदरकर (३५, रा. कलमठ, ता. कणकवली) याला अटक करण्यात आली आहे.

४ लाख ४७ हजार २४० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअपही जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ९ लाख ४७ हजार २४० रु.चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर व अति. पोलिस अधीक्षक नवमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक पंकज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक पालकर, पोलिस उपनिरीक्षक पवार तसेच पोलिस हेडकॉन्स्टेबल श्री. परब यांनी केली.


Spread the love

Related posts

सक्का भाऊच बनला वैरी? लवु सावंत खून प्रकरणात अजित सावंत याला अटक

news

‘डीआरडीओ’चे अधिकारी डॉ. प्रदीप कुरूलकर यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश….

news

आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फसवणूकप्रकरणी क्लास मॅनेजरला अटक!

news

Leave a Comment