स्टोरी

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघा’चे देशव्यापी आंदोलन!​

Spread the love

प्रतिनिधी: अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारविरोधात देशव्यापी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. गत ३० मे रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असून, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या संघर्ष समितीने विविध टप्प्यांवरील सविस्तर आंदोलन कार्यक्रम निश्चित केला आहे.​ या आंदोलनाद्वारे शिक्षक पात्रता परीक्षा बाबतच्या २०१७ च्या अधिसूचनेत बदल करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील जाचक अटींची दुरुस्ती, शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे पूर्णपणे बंद करणे आणि शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे या प्रमुख मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधून दबाव निर्माण केला जाणार आहे.​

संघर्ष समितीने निश्चित केलेला आंदोलन कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल:​

१) पहिला टप्पा: ११ ते १८ जून २०२६ (राष्ट्रीय स्तर)​भारत सरकारच्या शिक्षण मंत्र्यांकडे असंतोष व्यक्त करणारे पत्र सादर करणे.​राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या प्रमुखांना मागण्यांचे निवेदन सादर करणे.​आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यासाठी कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करणे व विविध राज्यांसोबत ऑनलाईन बैठका घेणे.​राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) च्या अध्यक्षांना तातडीने पत्र पाठवून, या समस्येवर चर्चा करण्यासाठी भेट मागणे.​

२) दुसरा टप्पा: १५ ते ३० जून २०२६ (जिल्हा स्तर)​देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करणे व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यांचे शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणे.

​३)

तिसरा टप्पा: ५ ते १५ जुलै २०२६ (राज्य स्तर)​राज्य पातळीवर विविध निषेध व आंदोलन कार्यक्रम आयोजित करणे.​पत्रकार परिषदा घेऊन व्यापक जनजागृती मोहीम राबवणे आणि संबंधित राष्ट्रीय संलग्न संघटनांसोबत बैठका घेणे.​

४) चौथा टप्पा: १ ते १२ ऑगस्ट २०२६ आणि संसदेवर धडक​राज्य पातळीवरील उपक्रमांचा राष्ट्रीय स्तरावर आढावा घेऊन प्रशासकीय व कायदेशीर पर्यायांचे मूल्यांकन करणे.​ संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विविध राष्ट्रीय संघटनांना सोबत घेऊन दिल्लीत भव्य देशव्यापी आंदोलन करणे.

सक्रिय सहभागाचे आवाहन…!

“शिक्षकांच्या अस्तित्वाचा आणि हक्काचा हा लढा असून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. या देशव्यापी आंदोलनात महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य संघ, जिल्हा संघ, तालुका संघ तसेच नपा/मनपा शिक्षक संघ यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी करावे,” असे आवाहन राज्य अध्यक्ष देविदास बस्वदे आणि सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी केले आहे.

श्री. महादेव लक्ष्मण देसाई-: उपाध्यक्ष -अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ.


Spread the love

Related posts

भालावल गावात स्व. जिजाबाई सावंत यांचा स्मृतिदिन साजरा..! विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अभिवादन!

news

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १२ एप्रिल २०२३ रोजी कल्याण पूर्वेत होणार दणक्यात आगमन !

news

आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा

news

Leave a Comment