स्टोरी

वडाचापाट येथे संडे ऑन सायकल उपक्रम!

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मसुरे प्रतिनिधी : ग्रामपंचायत वडाचापाट येथे शासनाच्या निर्देशानुसार फिट इंडिया मिशन अंतर्गत तंदुरुस्त निरोगी आरोग्यसंपन्न फिटनेसची गोडी वाढविण्यासाठी “संडे ऑन सायकल” मोहीम संपन्न झाली. सर्व सहभागी सायकलपटूना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमांस ग्रामपंचायत वडाचापाट उपसरपंच सचिन पाताडे, माजी.पंचायत समिती सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, ग्रामपंचायत सदस्य विनायक प्रभुदेसाई, संपर्क अधिकारी तथा केंद्र प्रमुख गोसावी सर,ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर आणि सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि आशा सेविका व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई यानी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

आयपीएस अधिकारी अभिनव कुमार यांचं आर्यन खान यांना पत्र…..

news

नवी मुंबईत सांडपाण्‍यावर घेतले जाते भाज्‍यांचे पीक !शारीरिक त्रास होऊनही तक्रार केलेली नाही!

news

भारतीय बौद्ध महासभेच्या सावंतवाडी शाखेमार्फत ‘महिला उपासिका’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

news

Leave a Comment