स्टोरी

गीत गायन स्पर्धेत वीर वामन राऊळ प्रथम..! मळेवाड कोंडूरे येथील युवा मित्रमंडळाचेआयोजन.

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: मळेवाड कोंडूरे येथील युवा मित्रमंडळ आयोजित गीत गायन स्पर्धेत वीर वामन राऊळ याने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सर्वज्ञ वराडकर याने द्वितीय क्रमांक, रुद्र स्वार याने तृतीय क्रमांक पटकाविला. तर या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम काव्या पिकुळकर आणि उत्तेजनार्थ द्वितीय कैवल्य गावडे यांनी पटकाविला.

या गीत गायन स्पर्धेसाठी प्रसिद्ध भजनी बुवा निलेश मेस्त्री, पखवाज वादक किशोर सावंत, आत्माराम कवठणकर, सुरेंद्र साईल यांनी संगीत साथ केली. तर या स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्वप्निल गोरे यांनी काम पाहिले. यावेळी युवा मित्रमंडळाचे राजू रेडकर, सुरेश नाईक, पोलीस पाटील बंटी मुळीक, प्रमोद मुळीक, सुधीर मुळीक, आल्हाद नाईक, प्रवीण नाईक, मनोहर केरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हेमंत मराठे यांनी केले.


Spread the love

Related posts

‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम’ राबवा; घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ! हिंदु जनजागृती समितीची मागणी.

news

टेक ऑफ घेताना विमान कोसळले

news

कै. श्रीमती लक्ष्मीबाई मुरारी माधव जिल्हा परिषद शाळा नंबर ६ भटवाडी, शाळेच्या दुरुस्तीसाठी पंधरा लाख रुपये मंजूर.

news

Leave a Comment