शिक्षण

राज्याचा २०२५- २६ चा बारावीचा निकाल ८९:७८ टक्के..!

Spread the love

२ मे वार्ता: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोकण विभाग निकालात अव्वल ठरला आहे. अखेर १४ लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आज संपली आहे. बोर्डाकडून अगोदर विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली असून बारावीच्या निकालाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, राज्यात यंदा कोकण विभाग आणि विद्यार्थ्यांपैकी मुलींनी निकालात बाजी मारली आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२४- २५ चा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के होता. फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च २०२६ चा निकाल २.०९ टक्क्यांनी कमी आहे. यावर्षी बारावी निकालाची टक्केवारी खालावली असल्याचे दिसून आले.

बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईट्स लिंक

१) mahahsscboard.इन

२) hscresult.mkcl.ऑर्ग

३) sscboardpune.इन

४) sscresult.mkcl.org

५) https://results.digilocker.gov.in/

६) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results


Spread the love

Related posts

मसुरेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप..!

प्रसाद परब

जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या बळावर श्रद्धा चीले हीने केले तिहेरी यश संपादन

news

कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

news

Leave a Comment