स्टोरी

२७ व २८ मार्च रोजी कुडाळ येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन.

Spread the love

कुडाळ प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन व उच्च तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय ग्रंथालय अधिकारी कार्यालय जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ते २७ व २८ मार्च या दोन दिवसात कुडाळ येथील गुल मोहरहॉटेलमधील श्री महालक्ष्मी हॉल येथे ग्रंथोत्सव होणार आहे. यासाठी नियोजन बैठक कुडाळ येथील रावबहादूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय या बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे उपस्थित होते. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, अरविंद शिरसाट, डॉ. विवेक पाटणकर, महेश बोवलेकर, संजय शिंदे, जयेंद्र तळेकर, कौशल्य पवार, सुनिता भिसे, महेंद्र पटेल, सचिव राजन पांचाळ, गुरुनाथ मडवळ, प्रसाद जाधव, सतीश गावडे आधी उपस्थित होते. दोन दिवसीय ग्रंथोत्सव मध्ये साहित्यिक तसेच सांस्कृतिक व ग्रंथ चळवळ वाढीच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे आधी उपस्थित राहणार आहेत. असे बैठकीत ठरवण्यात आले.

फोटो: कुडाळ ग्रंथ उत्सव नियोजन संदर्भात बैठकीत जिल्हा ग्रंथ जिल्हाधिकारी सचिन हजारे, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, अरविंद शिरसाट, राजन पांचाळ, डॉ. विवेक पाटणकर, डॉ. महेश बोवलेकर, गुरुनाथ मडवडवळ, सतीश गावडे आधी.


Spread the love

Related posts

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या दैनंदिनीचे मुंबई मातोश्री येथे प्रकाशन! पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले प्रकाशन.

news

मसुरे बागवे हायस्कूल येथे ८ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलीस पराक्रम स्मरण दिन कार्यक्रम..!

प्रसाद परब

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन ७ जुलै रोजी.

news

Leave a Comment