स्टोरी

मंगेश तळवणेकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केली जाईल..! खासदार नारायण राणे

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: जिल्हा परिषद चे माजी सभापती मंगेश तळवणेकर यांना खासदार नारायण राणे यांनी खास शुभेच्छा देत जिल्हा परिषद महायुतीची सत्ता आल्यावर श्री मंगेश तळवणकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केली जाईल. असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे श्री तळवणेकर पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात जिल्हा परिषद मध्ये पाहायला मिळणार आहेत. श्री मंगेश तळवणेकर यांनी कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. या भागाच्या विकासासाठी आपण मैदानात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आज रविवारी कणकवली येथे खासदार नारायण राणे यांनी त्यांना खास निमंत्रित केले. आणि त्यांची समजूत काढली आहे.

श्री रमंगेश तळवणेकर हे चांगले कार्यकर्ते आहेत. सामाजिक क्षेत्रात व राजकारणात त्यांनी भरीव असे काम केले आहे. त्यामुळे त्यांना एक अनुभवी कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्हा परिषदच्या स्वीकृत सदस्य पदी नियुक्ती केली जाईल. हे आश्वासन दिल्यानंतरच मंगेश तळवणेकर यांनी कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष उमेदवारी मागे घेण्याचे निश्चित केले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती गुरुनाथ पेडणेकर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

अंतरिम अर्थसंकल्प २०२४ – रिअल इस्टेट क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या प्रमुख घोषणा पुढीलप्रमाणे आहेत…! बांधकाम व्यवसयिक नीरज देसाई.

news

राज्यातील ९०९ गावे आणि वाड्या येथे २१३ टँकरद्वारे पाणीपुरवठा!

news

सावंतवाडी लक्ष्मीनगर येथील रस्त्याच्या उतारतीवरचं मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचे सत्र सुरू..! रवी जाधव

प्रसाद परब

Leave a Comment