स्टोरी

गिर्ये येथे संविधान दिन साजरा.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: देशात कायद्याचे, न्यायाचे आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्याचप्रमाणे नागरिकांना संविधानातील मूलभूत हक्क कर्तव्य आणि मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी संविधानाची गरज आहे असे प्रतिपादन महेंद्र बापू गिरकर यांनी गिर्ये येथे बोलताना केले.

भारतीय संविधानानिमित मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ आणि पंचशील महिला मंडळ यांच्या वतीने गिर्ये बुद्धविहारात संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी संविधान प्रस्तावने ची प्रत सर्वांना वितरित करण्यात आली.

यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष दीपक गिरकर, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष संतोष गिरकर, सरचिटणीस सचिन गिरकर, गिर्ये गावच्या सरपंच लता गिरकर, बौद्धचारी संजीवनी गिरकर त्याच प्रमाणे मंडळाचे मार्गदर्शक महेंद्र गिरकर, सुनिल गिरकर, सिद्धार्थ गिरकर, संजय गिरकर,चंद्रकांत गिरकर आणि महिला उपस्थित होत्या.


Spread the love

Related posts

ओटव नांदगाव प्रशालेच्या विध्यार्थ्यांची वर्षा सहल उत्साहात संपन्न!

news

जलवाहिन्या दुरुस्तीचा खर्च कोणाच्या डोईवर?; सावंतवाडीत गॅस वाहिनीच्या कामामुळे नगरपरिषदेच्या निधीवर ताण.

प्रसाद परब

गोळवण शाळा नंबर १ येथे आरोग्य शिबिरास प्रतिसाद…!

news

Leave a Comment