स्टोरी

देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात १०जुलै रोजी पौर्णिमा उत्साहात साजरी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी (श्रीरंग जोसोलकर):

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा.

ह्या उक्तीप्रमाणे माणसाच्या जीवनात गुरूला खूप महत्त्व आहे. शिक्षकांना वैदिक काळापासून गुरूचे स्थान आहे.त्यांच्या ॠणांतुन आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात गुरूंविषयी आदर प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा उत्साहात सादरी करण्यात आली.

यावेळी जगतगुरु व्यास मुनींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.यावेळी सर्व शिक्षक तिथे विद्यार्थी उपस्थित होते.प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व आपल्या गुरूंच्याप्रती आदर व्यक्त केला विद्यार्थी श्रीरंग जोसोलकर , चिन्मय सावंत यांने गुरुपौर्णिमेबद्दल माहिती सांगितली.

मुख्याध्यापक श्री यशोधन गवस यांनी आपले मनोगतपर भाषण व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती कायम आदर बाळगून आपलं काम चोख बजावले पाहिजे तरच आयुष्यात आपण यश संपादन करू शकतो असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन sy मधील सोहम शिरोडकर याने केले. हा गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांचा मोलाचा सहभाग लाभला.


Spread the love

Related posts

मुंबईचे माजी नगरसेवक शैलेश परब यांना मातृशोक!

news

योग विद्या ही भारताची अमूल्य प्राचीन परंपरा – महेश मालक इंगळे

प्रसाद परब

राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार..! माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

प्रसाद परब

Leave a Comment