शिक्षण

POSCO ACT संदर्भात उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे जागृती कार्यक्रम संपन्न.

Spread the love

कुडाळ (मुळदे): उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने ‘POSCO ACT’ या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण कायद्यावर आधारित जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. पवित्रा धुरी-परब (सिंधुदुर्ग) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना POSCO ACT (Protection of Children from Sexual Offences Act) संदर्भात सखोल माहिती दिली. त्यांनी कायद्याची व्याप्ती, तरतुदी, गुन्हेगारी प्रकरणांतील प्रक्रिया तसेच मुलांच्या सुरक्षेसाठी असलेले उपाय याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव श्री. तोटावर, सहाय्यक प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश उईके, विविध विभागांचे प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित विध्यार्थी

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. श्रीमती. नीलिमा पवार यांनी केली, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. श्रीमती. जया वाघ यांनी यशस्वीरित्या पार पाडली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बी.एस्सी. (उद्यानविद्या) तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कुमारी निकिता प्रभू तेंडुलकर हिने केले.


Spread the love

Related posts

शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने कलंबिस्त येथील गणशेळवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

सातार्डा येथील प्रशालेत प्रा. रूपेश पाटील यांचे उद्या करिअर मार्गदर्शन.

news

परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने २९ जुलै रोजी सावंतवाडीत ओपन सेमिनार….

news

Leave a Comment