स्टोरी

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सावंतवाडी तीन दिवसीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशन आयोजित खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सावंतवाडी तीन दिवसीय दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १० एप्रिल या तीन दिवसाच्या कालावधीत सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान जवळ दशावतार नाट्यमहोत्सव सायंकाळी सात वाजता होणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब व सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ यांनी दिली. कोकणची दशावतार कलेला राजाश्रय मिळावा यासाठी सह्याद्री फाउंडेशनने सातत्याने दशावतार नाट्य महोत्सवाच्या आयोजन करून दशावतार कलेला उर्जित अवस्था देण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच धर्तीवर खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने तीन दिवसीय दशावतार नाट्यमहोत्सवाच्या आयोजन करण्यात आले आहे.

या नाट्य महोत्सवामध्ये दर्जेदार दशावतार नाटकांचे आयोजनही करण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दशावतार नाट्य महोत्सवाच्या आयोजन केले होते त्यला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतरआता येत्या ८ ते १० एप्रिल या कालावधीत दशावतार नाट्य महोत्सव होणार आहे. नाट्यमहोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ८ एप्रिल रोजी -वाळवेश्वर दशावतार नाट्य प्रायोग होणार आहे. तर ९ ता.-बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य प्रायोग १० ता.-पर्सेकर दशावतार नाट्य प्रायोग होणार आहे. तरी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे सचिव प्रताप परब यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

आध्यात्मात काळानुरुप बदल आवश्यक! नितीनभाऊ मोरे….

news

अल्पवयीन मुलांकडे दुचाकी वाहने पालकांनी देऊ नयेत! पोलिस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे

news

पर्यटन तज्ज्ञ डी. के. सावंत यांचे दुःखद निधन

news

Leave a Comment