स्टोरी

महिला शिवसेनेच्या वतीने ८ मार्चला महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे सावंतवाडीत आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी:  दि.८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सावंतवाडी शिवसेना महिला शहर आघाडीच्या वतीने महिलांना वंध्यत्व निवारण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. मृदुला महाबळ (अंबापुरकर) यांना आमंत्रित करण्यात आले आहे .डॉ. मृदुला अंबापुरकर या स्त्रीरोग तज्ञ ,प्रसुतीतज्ञ, टेस्ट ट्यूब बेबी स्पेशालिस्ट आहेत या कार्यक्रमात त्या महिलांना जागतिक मार्गदर्शन करणार आहेत.

त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य, फनी गेम, संगीत अशा महिलांचे विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन आठ मार्च रोजी सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत महिलांसाठी फनी गेम च आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना महिला उपशहर प्रमुख सौ. शिवानी पाटकर आणि शिवसेनेच्या शहरातील सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यानी केले आहे


Spread the love

Related posts

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन.

news

चौथरा बांधकाम करताना गटार न काढल्यामुळे घराला धोका!

news

सिंधू रनर टिमने म्हापसा (गोवा) ते सावंतवाडी ५० किमी इंटरसिटी रन पूर्ण केली.

news

Leave a Comment