स्टोरी

आंगणेवाडी श्री देवी भराडी मंदिर येथे ३ डिसेंबर पासून ओटी भरण्याचा विधी वार्षिकोत्सवा पर्यंत बंद!

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे ३ डिसेंबर २०२४ ते सन २०२५ या वर्षा मध्ये होणाऱ्या आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या श्रीदेवी भराडी मातेच्या ऊत्सवा पर्यंत मंदिरात चालू असलेल्या धार्मिक विधी मुळे “ओटी भरणे,साडी चोळी(खण), नारळ(श्रीफळ) ठेवणे,नवस फेडणे,गोड पदार्थ ठेवणे, गाऱ्हाणी घालणे.” इत्यादी सर्व विधी बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे वरील दर्शविलेले कोणतेही पुजा विधी साहित्य किंवा नवस फेडीचे साहित्य कृपया भाविकांनी मंदिरात दर्शनास येताना आणू नये. त्याचा स्वीकार मंदिरात केला जाणार नाही. आई भराडी मातेच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांनी याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय,आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

राज्यातील २० सहस्र शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा नाही! शिक्षणमंत्री दिपक केसरकर

news

हडी जेष्ठ नागरिक संघास सर्वतोपरी सहकार्य….! सरपंच प्रकाश तोंडवळकर

news

पळसंब मध्ये स्वच्छता व नशामुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन.

प्रसाद परब

Leave a Comment