स्टोरी

वैभववाडी, करुळ व भुईबावड्यात ढगफुटी..! भुईबावाडा घाटात कोसळली दरड..! वाहतूक ठप्प

Spread the love

वैभववाडी प्रतिनिधी: करुळ व भुईबावडा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक वर्षांनंतर करूळ नदीला महापूर आला आहे. मुसळधार पावसाने सर्वांची दाणादाण उडवून दिली. तर नदीकाठची शेती जमिनदोस्त झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी भुईबावडा घाटात दाखल झाले आहे.

सोमवारी सायंकाळी सह्याद्री पट्ट्यातील करुळ, भुईबावडा व इतर गावात मुसळधार पाऊस झाला. पावसाने अक्षरशः हाहाकार उडवून दिला. पहिल्यांदाच गावातून वाहणाऱ्या नद्याना महापूर आला आहे. तर अनेक काॅजवे पाण्याखाली गेल्याने वाड्यांचा संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणी घाट मार्गात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भुईबावडा घाटात नाल्यांचे स्वरूप आले आहे. घाट रस्त्यात ठिकठिकाणी चिखल माती आली आहे. तर दोन ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. करुळ घाट वाहतुकीला बंद आहे. या घाटात देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी व वहाळांच्या काठावर असलेले भात शेती ही जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.


Spread the love

Related posts

मालवण समुद्र किनारपट्टी भागातील सर्व विद्युत वाहिन्या होणार भूमिगत

news

अमृत योजनेअंतर्गत कल्याण ग्रामिण मधील भाल गावात जलकुंभाची निर्मिती!

news

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा १६ सप्टेंबर रोजी.

newss

Leave a Comment