शिक्षण

परब मराठा समाज मुंबई पालघर च्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.

Spread the love

मुंबई (पालघर): परब मराठा समाज मुंबई पालघर तर्फे दिनांक २८ सप्टेंबर रोजी आत्ता अकरावी बारावी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच पदवीधर विद्यार्थी विद्यार्थिनी आणि कोणत्याही फॅकल्टी चे वय वर्ष ३० पर्यंतच्या व्यक्तींसाठी सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर विद्याविहार जुनियर कॉलेज, बाजार गल्ली, विरार वेस्ट या ठिकाणी दुपारी १:३०  ते ३ या वेळेत होणार आहे. विध्यार्थ्यांनी येतांना सोबत पालकांना घेऊन यायचे आहे. आपल्या परब समाजातील मुले तसेच इतर मुलांना हि या शिबीरामध्ये प्रवेश आहे. मार्गदर्शन विनामूल्य आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी मिडीयम चे विद्यार्थी या शिबीरात सहभागी होऊ शकतात. तरी आपल्या समाजातील मुलांनी प्रथम लाभ घ्यावा असे आवाहन परब मराठा समाज मुंबई पालघर च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्री बापू परब संपर्क क्रमांक 8689819176 वर संपर्क करावा.


Spread the love

Related posts

कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

news

कळसुलकर हायस्कूलच्या इयत्ता पाचवी व आठवी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

प्रसाद परब

शाळांमधील सुरक्षितता वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक…! राज्य शासनाचा निर्णय.

news

Leave a Comment