स्टोरी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केलेल्या आव्हानाला सौ.अपर्णा प्रशांत कोठावळे यांचा कौतुकास्पद प्रतिसाद.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये नुकत्याच सुरू झालेल्या सिटीस्कॅन विभागा ठिकाणी पेशंटची वाढत चाललेली गर्दी पाहता पेशंटला बसण्यासाठी टेबल व खुर्च्या अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे वृद्ध व इतर पेशंटांना त्या ठिकाणी तासोन तास उभ राहावं लागत होते. हे पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दानशूरांनी हॉस्पिटलसाठी खुर्च्या द्यावेत असे आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला सौ. अपर्णा प्रशांत कोठावळे यांनी योग्य प्रतिसाद देऊन आज दिनांक १२ जुलै २०२४ रोजी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हॉस्पिटलला स्वखर्चाने १२ खुर्च्या दान केल्या.

सदर कार्यक्रमा दरम्यान एका गरीब महिला पेशंटला डॉक्टरांनी १६०० चे इंजेक्शन लिहून दिलं असता त्या पेशंट जवळ तेवढे पैसे नव्हते. हे जेव्हा अपर्णा कोठावळे यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिला पेशंटला १६०० रुपये इंजेक्शन साठी देऊन त्यांना मोठे सहकार्य केले असता त्या पेशंटने त्यांचे खूप आभार मानले.

सामाजिक बांधिलकीच्या आव्हानाला व प्रामाणिक सेवाभावी कार्याला दानशूरांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दानशूरांचे मनःपूर्वक आभार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष श्री. बागवे सर यांनी मानले आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकरर्ती अपर्णा कोठावळे, जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, डॉ.गिरीश चौगुले, डॉ.प्रवीण देसाई, डॉ. आकाश मंगलगी डॉ. ईश्वर पटणे, तसेच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सचिव समीरा खलील, रवी जाधव, रूपा मुद्राळे व शैलेश गावडे उपस्थित होते.


Spread the love

Related posts

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदी येथून ८ जुलै २०२६ रोजी प्रस्थान होणार..!

प्रसाद परब

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा कारागृह वर्ग २ येथे आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन…!

news

महाराष्ट्रातील ऐतिहासिक पारगड किल्ल्यावर शिवव्याख्याते अँड शिवाजी देसाई यांचा गौरव.

news

Leave a Comment