शिक्षण

कारिवडे पेडवे नंबर २ शाळेचा चा प्रकाश सबनीस याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कारिवडे पेडवे नंबर २ शाळेचा विद्यार्थी प्रकाश भालचंद्र सबनीस याने २०८ गुण प्राप्त करून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.तसेच शाळेचा निकाल १००% लागला असून विद्यार्थी चांगल्या गुणांनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. त्यांना वर्गशिक्षिका श्रीम.विद्या वालावलकर मॅडम यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापिका श्रीम.ऐश्वर्या पोकळे व शिक्षकवृंद, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ तसेच ग्रामस्थ यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षांमधून मधून या शाळेचे विद्यार्थी उत्तम यश संपादन करत आहेत त्यामुळे शाळेचा नावलौकिक वाढत आहे.


Spread the love

Related posts

दर्पण प्रबोधिनीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर! पाचवीतून अर्णव भिसे, आठवीतून जस्मिता पावसकर प्रथम.

news

वरद वाळकेची विभागीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड!

news

दहावीच्या परीक्षेत ९३.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण!

news

Leave a Comment