स्टोरी

सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड वरील प्रसाधनगृहाची दुरावस्था..! प्रवासी व नागरिकांमध्ये नाराजी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॅन्ड वरील प्रसाधनगृहाची अक्षरशा वाईट दुर्दशा झाली आहे. त्या प्रसाधनगृहाची दुरुस्ती करण तर दूरच स्त्री व पुरुष दोन्ही प्रसाधनगृहाच्या दरवाजांना जाळी ठोकून प्रसाधनगृह बंद करण्यात आले आहे.

ऐन पावसाच्या दिवसात प्रवासी महिला, विद्यार्थिनी तसेच त्या परिसरातील व्यावसायिक व नागरिकांचे अतोनात हाल झालेले आहे. यासंदर्भात शैलेशतील शिरोडकर माणगाव येथील रहिवाशी यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून यासंदर्भात काही करता येईल का बघा अशी विनंती केली. त्याचप्रमाणे तेथील परिसर अतिशय दुर्गंध युक्त बनलेला आहे. कचऱ्याचे साम्राज्य त्या ठिकाणी वाढत चाललेले आहे. तसेच प्रसाधनगृहाच्या टाकीची फरशी फुटून त्यातून घाण वास येत आहे टाकी उघडी असल्याकारणाने त्यामध्ये कोणी पडेल याचीही भीती निर्माण झालेली आहे. प्रसाधनगृहाच्या बाजूलाच खाद्यपदार्थाची बेकरी व खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत.

 

 या सर्व गोष्टींची पाहणी करून यासंदर्भात उद्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून डेपो मॅनेजर यांना निवेदन देऊन यावर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे.


Spread the love

Related posts

कारिवडे येथील श्री देवी कालिका देवस्थान समितीचे मंत्री श्री दीपक केसरकर यांना निवेदन.

news

कांदळवन सरक्षण व उपजिवीका निर्माण योजनेची कोकणात जनजागृती!

news

चाकरमान्यांच्या हितासह पारपोली गावासाठी यापुढेही कार्यरत..! पारपोली ग्रामविकास मंडळाच्या कार्यक्रमात गोपाळ गावकर यांची ग्वाही.

news

Leave a Comment