स्टोरी

जिल्ह्यातील बेरोजगारांच वाटोळं करणाऱ्या केसरकरांनी एमपीएससी , युपीएससीच्या गोष्टी करू नयेत…! योगेश धुरी

Spread the love

कुडाळ प्रतिनिधी: साधी परीक्षा केंद्र जिल्ह्यात आणता आली नाहीत, आणि हे जिल्हातील मुलांना अधिकारी बनवणार केसरकरांना शुभेच्छा देताना लाज वाटली पाहिजे होती, एवढी चांगली गुणवत्ता असताना जिल्हातील मुलांचं पाय खेचण्याचं काम केसरकर करता आहेत. अशी टिका कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी मंत्री दिपक केसरकर यांच्यावर केली आहे.

योगेश धुरी पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद च्या शाळा बंद करण्याचा ठेका घेणाऱ्या मंत्र्यांनी अशी आश्वासन देऊ नयेत. हल्ली झालेल्या केसरकरांच्या शिक्षक भरतीत जिल्ह्यातील किती मुलांना फायदा झाला हे एकदा प्रेस घेऊन केसरकरांनी सांगावे. तलाठी परीक्षेत जिल्ह्यातील किती मुलं तलाठी म्हणून लागलीत हे पण केसरकरांनी सांगावे. केसरकर हे सोंगाडे आहेत जिल्हातील बेरोजगारांच वाटोळं करणारे मंत्री म्हणून त्यांची जिल्हातील इतिहासात नोंद होईल. केसरकरांनी सांगितलेल्या गोष्टी केव्हाच पूर्ण होत नाही उदा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, सेट ऑफ बॉक्स ची कपंनी,पाणबुडी, सावंतवाडी एसटी स्टँड चे नूतनी करण असे अनेक गोष्टी केसरकर करू शकले नाहीत. त्यामुळे केसकरांनी चंकी पांडे सारख्या हवेतल्या गोष्टी करू नयेत. जिल्ह्यातील एका तरी मुलाला इच्छित ठिकाणी प्रवेश मिळाला नसेल तर त्यांना घेऊन केसकरांच्या कार्यालया बाहेर युवासेना स्टाईलने अनोख्या पद्धतीने आंदोलन करु. असा इशारा हि कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिला आहे.


Spread the love

Related posts

आयुष्मान भारत मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार.

news

गणित प्राविण्यमध्ये कु. जतीन पाटीलचे घवघवीत यश !

news

कलंबिस्त पंचकोशी दुग्ध सहकारी संस्था मर्यादित कलंबिस्त या संस्थेच्या वार्षिक बैठक संपन्न!

news

Leave a Comment