स्टोरी

सोनुर्ली प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य शिबिरात सोनुर्ली गावातील २२३ रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात आली.

सोनुर्ली प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर सरपंच नारायण हिराप, ग्रामपंचायत सदस्य नागेश गावकर, संजना राऊळ, हर्षा गावकर, सोनुर्ली गावचे प्रमुख मानकरी शंकर उर्फ बाळा गावकर, जयराम गावकर, माजी पोलीस पाटील रामा जाधव, असनिये ग्रामसेवक मुकुंद परब, संदेश मडूरकर, नरेश मोर्यें, गोरखनाथ गोसावी, गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ प्रशांत ससाणे,डॉ रघुवीर हडीमणी, डॉ सायली कासार, डॉ लतिषा, डॉ रश्मी जोशी कर्मचारी सुषमा नाईक, सुरेंद्र चंद्रवंशी, गिरीश नाईक, राजेश भोजे, दिग्विजय राणे, सागर धुरी आदी उपस्थित होते.

 

यावेळी डॉ प्रशांत ससाणे यांनी आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर ती जीवन जगण्याची शैली आहे. गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान हे आयुर्वेदिक क्षेत्रातले चांगले संस्थान आहे. या ठिकाणी रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊ नये यासाठी तसेच आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर घडवण्यासाठी या संस्थानच्या एकुण १४ विभागमार्फत काम केले जाते. त्यामुळे आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी या संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन केले. यावेळी मुकुंद परब यांनी आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार हे शाश्वत उपचार असुन सर्वांसाठी एक देणगीच आहे. त्यामुळे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आयुर्वेदाचे तज्ञ डॉक्टर घडविण्यासह आयुर्वेदाचा प्रसार व प्रचारासह राबवित असलेले आरोग्य विषयक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या अधिष्ठाता डॉ सुजाता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, घसा, थायरॉईड, बालरोग, पचन, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या शिबिराचे उत्कृष्ट नियोजन सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांनी केले होते. त्यामुळे या शिबिराला उत्स्फूर्त लाभला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुकुंद परब यांनी तर आभार संदेश मडूरकर यांनी मानले.


Spread the love

Related posts

बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेच्यावतीने प्राथमिक शाळेतील सर्व १६६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

लवकरच काश्मीर आणि कन्याकुमारी या नेटवर्कला नाशिक जिल्हा जोडला जाणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्वपूर्ण घोषणा.

news

मालवण आयटीआय मध्ये “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” मेळावा !

news

Leave a Comment