स्टोरी

गुंडू जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारांने सन्मानित…!

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गुंडू उर्फ राजेश सदाशिव जाधव यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत देण्यात येणारा यावर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा स्वच्छता तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. मुंबई नरिमन पॉईंट येथील जमशेद भाभा नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

राजेश जाधव गेली ३५ वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन समिती, दक्षता समिती, समाज कल्याण समिती, व्यसनमुक्ती केंद्र आदीसह शासकीय समितीवर त्यांनी काम केले आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांनी गोरगरिबांना मिळवून दिला आहे. मागासवर्गीय समाजाच्या विकासासह ओटवणे गावाच्या विकासात त्यांनी आपले योगदान दिले आहे. राजकीय क्षेत्रातही त्यांनी विविध पदावर काम केले आहे.

राजेश जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राजेश जाधव यांचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकरात लवकर मार्गी लावा! रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष मिहिर मठकर

news

कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधांमुळे ग्रामस्थ्य आक्रमक!

news

छत्रपती शिवरायांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे !खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली मागणी!

news

Leave a Comment