स्टोरी

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानद्वारे सोनुर्ली येथे मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १७ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सोनुर्ली प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, घसा, थायरॉईड, बालरोग, पचन, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करुन रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात येणार आहे.

   सोनुर्ली परिसरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना कोमसापचे पुरस्कार जाहीर.

प्रसाद परब

भारतीय सैन्य दलातुन निवृत्त झालेल्या मेजर सुभेदार यांचे गावात उस्फुर्त स्वागत! तळवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर नित्यानंद सावंत.

news

रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

news

Leave a Comment