स्टोरी

मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांची २१ फेब्रुवारी रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक…!

Spread the love

मुंबईस्थित कुडाळ मालवणवासीय चाकरमान्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आ. वैभव नाईक यांचे आवाहन.

 

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले चाकरमानी,ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक बुधवार २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश पाटील,कुडाळ संपर्कप्रमुख बाळा म्हाडगुत,महिला विधानसभा संपर्क प्रमुख अपूर्वा प्रभू हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी मुंबई ठाणे,कल्याण, विरार,वसई व इतर भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्वीय सहाय्यक अनंत पाटकर मोबा- ९०११९९५५०३ यांच्याशी संपर्क साधावा.


Spread the love

Related posts

सावंतवाडी एसटी बस स्थानकाच्या परिसरातील सर्व प्रकरच्या कामाची सुरुवात!

news

दक्षेश मांजरेकरने बिडीएस परीक्षेत पटकावले गोल्ड मेडल!

news

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे २३ मार्च रोजी साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळा! प.पु. जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती.

news

Leave a Comment