स्टोरी

मनसेच्या भव्य विद्यार्थी मेळाव्यात विद्यार्थ्यांचा पक्षप्रवेश…!

Spread the love

सावंतवाडी:  मनविसे जिल्हाध्यक्ष श्री.केतन सावंत यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी यांच्या माध्यमातून येथे संपन्न झालेल्या भव्य विद्यार्थी मेळाव्यात अनेक नवोदित विद्यार्थ्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा.श्री.संदीप दळवी व मनसे कामगार सेना राज्य सरचिटणीस मा.श्री. गजानन राणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.तसेच मान्यवरांकडून विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्री.केतन सावंत आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थी सेनेचे माजी युनिट अध्यक्ष कु.साहील तळकटकर व दिपाली राऊळ यांनी सूत्रसंचालन केले. तर या मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी चे सर्व पदाधिकारी तसेच विद्यार्थी सेनेचे सचिन पाटणकर, प्रतीक मालवणकर, अमोल नाईक, रसिका पालव, प्रणाली परब, संध्या पाताडे, सोनाली सावंत, शमिका सावंत, सेजल कुंभार, ओमकार नवार, भगवान राऊळ, गौरव राऊळ, यश नाईक उपस्थित होते.


Spread the love

Related posts

तालुक्यातील पूर परिस्थितीचा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडून आढावा!

news

गोव्यात ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी-२० परिषद’!

news

मसुरे मागवणे येथील सुनिता दुखंडे यांचे निधन.

news

Leave a Comment