स्टोरी

कोमसाप चे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने सत्कार…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद चे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी स्वतः लिखित केलेले शिवबा नाटक सावंतवाडी येथील महा सांस्कृतिक महोत्सवात सादर करण्यात आले. याबद्दल त्यांचा कोकण मराठी साहित्य परिषद च्या जिल्हा व सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, लेखिका उषा परब, उपजिल्हाधिकारी सोनटक्के, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत, जिल्हा खजिनदार भरत गावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, एडवोकेट नकुल पार्सेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव मंगेश पांचाळ, मंदार म्हस्के आधी उपस्थित होते.

कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी हे नाटक स्वतः लिहिले असून त्याने संभाजीची भूमिका ही साकारली आहे. हे नाटक सर्वांच्या हृदयाला भिडणारे आहे. अशा शब्दात उपस्थित मान्यवरांनी गौरव केला.

फोटो: सावंतवाडी कोकण मराठी साहित्य परिषद चे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, बाजूला एडवोकेट संतोष सावंत, उपजिल्हाधिकारी श्री सोनटक्के, तहसीलदार श्रीधर पाटील, अभिमन्यू लोंढे, भरत गावडे, राजू तावडे, नकुल पारसेकर, उषा परब, मंगेश पांचाळ, मंदार म्हस्के आधी.

छाया: भारत फोटो


Spread the love

Related posts

कोकण रेल्वेमार्गावर १० आणि १२ ऑक्टोबरला ‘मेगाब्लॉक’

news

१२ ऑगस्‍टला पुणे येथील नवीन उड्डाणपुलाचे उद़्‍घाटन !

news

कुख्यात गुंड अतिक अहमद दीड सहस्र कोटी रुपयांची संपत्ती जप्त!

news

Leave a Comment