स्टोरी

अभिमन्यू लोंढे यांना कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान..!

Spread the love

सावंतवाडी: येथील ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना त्यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वतीने यंदाचा जीवनगौरव पुरस्कार सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सिताराम गावडे, सौ. संयुक्ता गावडे, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, डॉ. दत्तात्रय सावंत, श्रीमती स्वार, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, माडखोलचे माजी सरपंच संजय लाड, चौकुळ गावाचे सामाजिक कार्यकर्ते व यशस्वी उद्योजक दिनेश गावडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्य संपादक सिताराम गावडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विशाल पित्रे यांनी केले.


Spread the love

Related posts

कोकरनागमध्ये गेल्या ५ दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच….

news

परमेश्वराने दिलेली सुंदर जबाबदारी म्हणजे दिव्यांग मूल…! सौ शरयू घाडी यांचे प्रतिपादन

news

सिंधुदुर्ग जिल्हातील शासकीय यंत्रणेच्या ढिम्म कारभाराबाबत जिल्हावासियांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना साकडे

news

Leave a Comment