स्पोर्ट

सिंधुदुर्गातील कुस्तीपटूंसाठी हवे ते सहकार्य करणार..! माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची ग्वाही.

Spread the love

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंतांचा जिल्हा आहे. येथील नररत्नांनी आपल्या कर्तृत्वाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. असे असले तरी क्रीडा क्षेत्रात मात्र अलीकडच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा कुठेतरी कमी पडताना दिसतोय. म्हणून आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा अवस्थेला उंचावण्यासाठी व जिल्ह्यातील कुस्तीपटूंसाठी पाहिजे ते सहकार्य करू, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे.

मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या वतीने अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव कुस्तीपटू ललित हरमलकर, खजिनदार गौरव कुडाळकर यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची गोवा येथे आज सदिच्छा भेट घेतली.

यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुस्ती खेळाला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती मदत करू, असे आश्वासनही माजी मंत्री सुरेश प्रभू यांनी मल्ल प्रतिष्ठान संस्थेला दिली.


Spread the love

Related posts

सावंतवाडीत मुक्ताई ॲकेडमी आयोजित जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा!

news

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आंबोली यांच्यावतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस उदंड प्रतिसाद…!

news

खासदार नारायण राणे चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन.

news

Leave a Comment