क्राईम

प्रेयसीच्या नादात पोलिसाची आत्महत्या?

Spread the love

मुंबई: पोलीस शिपायानं प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर  प्रेयसीला मेसेज आणि फोटो पाठवून त्यानं आत्महत्या केल्याचा प्रकार मुंबई वरळी येथे घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रजित साळुंखे (वय २७) असं आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे. तो एलए विभाग १ मध्ये कार्यरत होता. रविवारी रात्री वरळीच्या जलतरण तलावाजवळील लोखंडी ग्रीलला गळफास घेऊन त्यानं जीवनयात्रा संपवली. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानं त्यानं हे कृत्य केलं. इंद्रजितचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर त्यानं तिला दादरला सोडले. तेथून तो वरळीला आला. तेथून त्याने प्रेयसीला आत्महत्या करत असल्याचा मेसेज आणि फोटो पाठवला. त्यानंतर त्यानं हे पाऊल उचललं. या घटनेची नोंद वरळी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


Spread the love

Related posts

ठाणे : अवैध पाण्याच्या कॅन विक्रीचा धंदा उघडकीस; FDA ची धडक कारवाई

प्रसाद परब

कुडाळ पोलिसांची बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई..! ८३४५०-/ रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त.

प्रसाद परब

पुणे येथील ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’ प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत!

news

Leave a Comment