स्टोरी

म्हातारं माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही! मनोज जरांगे पाटीलांचा भुजबळ यांच्यावर हल्लाबोल……

Spread the love

२१ नोव्हेंबर वार्ता: माझे काही वाद होते पण व्यक्ती म्हणून कधीच विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे. म्हातारं माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही. पण मराठा आरक्षणाला विरोध केला तर मग मात्र काय खरं नाही, असे म्हणत मरठा आंदोलक मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेचं देहू, आळंदीत जंगी स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर सरकारला महाराजांच्या ओवींची आठवण करून दिली. सरकारला सद्बुद्धी मिळो असं साकडं जरांगेंनी या वेळी घातले.

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले, माऊली हे सर्वांना आशीर्वाद देऊन अनेकांचे संसार वसवतात. आरक्षणासाठीही त्यांनी आशीर्वाद दिला आहे.वारकरी संप्रदाय देखील आरक्षणासाठी पुढे येत आहे. जो संप्रदाय आजतागायत अशा गोष्टीत पडत नव्हता मात्र अनेक महंतांनी यावर भाष्य केलंय.अगदी देवाने ही आपल्याला कौल दिलाय. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांना ही त्रास दिला गेला आह. तुम्ही ही थोडा त्रास सहन करा.


Spread the love

Related posts

हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासूनच….!

news

शिक्षिका सौ. अर्चना संतोष सावंत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारांने सन्मानित.

news

ओटवणे गावचा सुपुत्र सुरेश वरेकर याने सहकर्मी प्रोडक्शन डिझाईनर म्हणून भूमिका बजावलेला बहुचर्चित ‘बारडोवी’ चित्रपट आज प्रदर्शित.

news

Leave a Comment