स्टोरी

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडल्या!

Spread the love

१ नोव्हेंबर वार्ता: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आंदोलन सुरू असतांना आज सकाळी मंत्रालया जवळ असलेल्या आमदार निवास जवळ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. या तोडफोड प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता आकाशवाणी आमदार निवास जवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात कारण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून हे आरोपी आल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की,  या तीन आंदोलकांवर कठोर कारवाई करु नका अशा सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत. हे आंदोलन शांततेत व्हायला पाहिजे, आमदारांची घरं जाळणं चुकीचं आहे. काही आमदारांनी बंदोबस्त घेतला आहे. मी मला बंदोबस्त घेतलेला नाही, असंही मुश्रीफ म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील  यांनी शासनाला सांगितले की, आज शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आज रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांबाबत जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. शासनाने शिंदे समितीचा अहवाल स्वीकारावा. विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देण्याची भूमिका जाहीर करावी.


Spread the love

Related posts

मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये बालिका दिवस साजरा…!

news

कल्याण पूर्वेत माता रमाई भिमराव आंबेडकर वृत्तपत्र वाचनालयाचे लोकार्पण!

news

मसुरे देऊळवाडा येथे दत्तजयंती उत्सव!

news

Leave a Comment