स्टोरी

ॲड. प्रा. अरुण पणदूरकर, प्रा. रुपेश पाटील यांचा सत्कार.! 

Spread the love

कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडीचा पुढाकार.

 

सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीच्या वतीने आज मासिक सभेचे आयोजन करण्यात आले. मासिक सभेच्या आयोजना दरम्यान कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्येष्ठ सदस्य तथा मार्गदर्शक ॲड. प्रा. अरुण पणदूरकर तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य प्रा. रुपेश पाटील यांच्या वैयक्तिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.  प्रा. पणदूरकर यांना नुकताच ‘गोमंतक जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाला असून त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तर प्रा. रुपेश पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचेही अभिनंदन कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, सावंतवाडीच्या वतीने करण्यात आले.

 

यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

दरम्यान आगामी काळात कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल चर्चा विनिमय करण्यात आला. तसेच पुढील कार्यक्रमाची दिशा निश्चित करण्यात आली. सभेचे आभार प्रदर्शन प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी केले.


Spread the love

Related posts

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने सावंतवाडीतील राजवाड्यात ‘प्रतापगडाचा रणसंग्राम’ व्याख्यानाचे आयोजन

news

जासई हायस्कूल मध्ये कर्मवीर जयंती व नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न.

news

वैकुंठरथ आणणे गोवा बनावटी दारू विक्री इतके सोप काम नाही..! लक्ष्मण कदम

news

Leave a Comment