स्टोरी

“गोमंतक (गोवा) जीवन गौरव २०२३” पुरस्काराने ऍड. प्रा. अरुण पणदूरकर यांचा केंद्रीय राज्य मंत्री यांच्या हस्ते विशेष सन्मान…

Spread the love

गोवा: दिनांक १ ऑक्टोबर २०२३ राेजी ऍड. प्रा. अरुण पणदूरकर यांचा सामाजिक कार्यात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल केंद्रीय राज्य मंत्री मा. श्री. श्रीपादजी (भाऊ) नाईक साहेब यांच्या हस्ते “गोमंतक (गोवा) जीवन गौरव २०२३” हा विशेष पुरस्कार देऊन खास गौरव “श्री. स्वामी समर्थ विद्यामंदिर समर्थगड, मडगाव, गोवा” येथे पाचव्या राष्ट्रीय गोमंतक (गोवा) गौरव पुरस्कार सोहळा २०२३ मध्ये केला गेला.

 

या खास सोहळा हुतात्मा अपंग बहूउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था, कराड कार्यक्षेत्र संपूर्ण भारत यांच्या तर्फे व श्री. स्वामी समर्थ विद्यामंदिर समर्थगड, मडगाव, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला होता.

या विशेष कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री मा. श्री. श्रीपादजी (भाऊ) नाईक साहेब यांच्या सोबत प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. नरेंद्र सावईकर मा. खासदार दक्षिण गोवा, मा. श्री. उल्हास तुयेकर विद्यमान आमदार, ऍड. सौ. आशा देसाई, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली तसेच मा. श्री. शाहू महाराज स्वामी समर्थ मंदिर प्रमुख, मा. श्री. महेश थोरवे, मा. उदय बने रत्नागिरी, मा. श्री. जयेश नाईक अध्यक्ष स्वामी समर्थ विद्यामंदिर समर्थगड, मडगाव, गोवा व मा. डॉ. सुनील फडतरे संस्थापक अध्यक्ष हुतात्मा अपंग बहूउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया थाटात संपन्न झाला. हुतात्मा अपंग बहूउद्देशिय विकास कल्याणकारी संस्थेतर्फे संपूर्ण भारताच्या कार्यक्षेत्रामधून दिला जाणारा हा “गोमंतक (गोवा) जीवन गौरव २०२३” हा विशेष सत्कार मानाचा समजला जातो.

 

या विशेष पुरस्काराबद्दल ऍड. प्रा. अरुण पणदूरकर यांनी पुरस्कार निवड समिती व हुतात्मा अपंग बहूउद्देशिय विकास कल्याणकारी संस्था, कराड कार्यक्षेत्र संपूर्ण भारत यांच्या व श्री. स्वामी समर्थ विद्यामंदिर समर्थगड, मडगाव, गोवा याचे मन:पूर्वक आभार मानले आहे व आपले सामाजिक कार्य करण्याचा घेतलेला वसा असाचा पुढे चालू ठेवण्याचे अभिवचन दिलेले आहे.

 

 


Spread the love

Related posts

वटवृक्ष मंदिरात भागवत कथेस प्रारंभ ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराजांनी भागवत कथेतून केले धर्म प्रबोधन!

news

अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना शिवरायांप्रमाणे तात्काळ मदत द्यावी! स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

news

स्वातंत्र्यालढ्यातील क्रांतीवीरांचे लंडन येथील स्थान असलेल्या ‘इंडिया हाऊस’वर बनणार चित्रपट!

news

Leave a Comment