स्टोरी

१ ऑक्टोबरपासून जन्म प्रमाणपत्राद्वारे मिळवता येणार सर्व कागदपत्रे !

Spread the love

१६ सप्टेंबर वार्ता: १ ऑक्टोबर २०२३ पासून जन्म प्रमाणपत्राविषयी (‘बर्थ सर्टिफिकेट’विषयी) नवीन नियम लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार, जन्म प्रमाणपत्राच्या आधारे शाळा प्रवेशापासून ते वाहनचालक परवाना, सरकारी नोकरी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, विवाह नोंदणी इत्यादी कागदपत्रे मिळवणे शक्य होणार आहे.केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२३’ सादर केले होते. यानंतर या विधेयकेला राष्ट्रपतींची अनुमती मिळाली. केंद्र सरकारने त्याअंतर्गत बनवलेले नियम १ ऑक्टोबरपासून लागू करण्याची घोषणाही केली आहे. नवा कायदा लागू झाल्यानंतर जन्म-मृत्यूचे दाखलेही डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.


Spread the love

Related posts

कलंबिस्त तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सौ मीनल महादेव जंगम यांची सर्वानुमते निवड.

newss

२ सप्टेंबरला ‘आदित्य-एल् १’ यान सूर्याकडे झेपावणार ! ४ मासांनी यान सूर्याच्या जवळ पोचणार

news

कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

news

Leave a Comment