स्टोरी

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: – मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी रसिकांची मने जिंकून घेतली होती. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून सीमा देव या अल्झायमर या आजाराशी झुंज देत होत्या. त्यातच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

अभिनेत्री सीमा देव यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझी आई’, ‘सुवासिनी’, ‘सोनियाची पावले’, ‘मोलकरीण’ यांसारख्या अनेक चित्रपटांत रमेश देव यांच्यासह भूमिका साकारल्या.‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘या सुखांनो या’ या चित्रपटांतील सीमा यांच्या भूमिका गाजल्या. १९६३ सालच्या ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा यांना मिळाला.


Spread the love

Related posts

मेंदूचे विकार, फिट्स, चक्कर, अपस्मार ग्रस्त मुलांसाठी १५ नोव्हेंबर रोजी कुडाळ येथे मोफत तपासणी शिबीर.

news

शिवम् असोसिएट चे अनोखे दातृत्व..!

प्रसाद परब

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी…..

news

Leave a Comment