क्राईम

नाशिक येथे ५ लाख रुपयांची लाच घेतांना प्रशासकीय अधिकार्‍याला अटक !

Spread the love

२० ऑगस्ट वार्ता: केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने प्रशासकीय अधिकार्‍याला ५ लाख रुपयांची लाच घेतांना अटक केली आहे. तसेच या वेळी ४३ लाख रुपयांची रक्कमही कह्यात घेतली आहे. हेमंत कुमार असे या अधिकार्‍याचे नाव असून ते सी.जी.एस्.टी.च्या भिवंडी आयुक्तालयात अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. २१ ऑगस्टपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आस्थापनाचे प्रलंबित जी.एस्.टी. प्रकरण निपटवण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच मागितल्यावरून हेमंत कुमार यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली, तसेच गुन्हाही नोंदवण्यात आला. त्यानंतर आरोपीने लाच म्हणून १५ लाख रुपयांच्या रकमेची बोलणी केली. याच लाचेला पहिला हप्ता घेतांना वरील कारवाई करण्यात आली.

१५ लाख रुपयांची लाच घेणारे नाशिकचे तहसीलदार निलंबित!
नाशिक येथील तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी १५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी त्यांना निलंबित केले आहे. वैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात ते लाच घेत होते.


Spread the love

Related posts

कणकवली एसटी आगाराचे चालक रुपेश ठाकूर निलंबित.

news

पोलीस कोठडीत रचण्यात आला पती आणि दीर यांच्या हत्येचा कट!अतिक याच्या पत्नीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून केला दावा

news

मुसलमान पोलीस हवालदाराकडून लव्ह जिहादद्वारे सहकारी महिलेची फसवणूक….

news

Leave a Comment