क्राईम

कुडाळ गोवेरी येथील जीवघेणा हल्ला प्रकरणातील संशयित आरोपीना १५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी!

Spread the love

कुडाळ: सन २०१४ मधील सुमारे अडीच लाख रुपये पैशाच्या देवघव व्यवहारावरून गोवेरी येथील एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांना जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये धारदार विळीचा वार केल्याने चौघेजण रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले आहेत. यातील जोरदार केलेल्या वार यामुळे ऋतीक परब यांच्या एका हाताची तिन बोटे तुटली आहेत. ही घटना गोवेरी माधववाडी येथे बुधवारी रात्री ८ वा. घडली. या प्रकरणी संशयित संतोष विलास चौधरी वय ३४ मुरबाड वर्धा (सध्या राहणार पानबाजार कुडाळ) यांच्या विरोधात कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले. तर विलासीनी वाळके व ऋतीक दोघांची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी संशयित श्री चौधरी याला कुडाळ न्यायालयाने १५ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. या घटनेची फिर्याद प्रतिक्षा विलास वाळके रा.गोवेरी माधववाडी यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. यानुसार १२ जुलै रोजी प्रतिक्षा हिचा भाऊ विकास त्याचा मित्र ऋतिक यशवंत परब रा. गोवरी परबवाडी याची वाढदिवसाची पार्टी प्रतिक्षा यांच्या घरात होती .भाऊ विकास हा जेवणासाठी चिकन घेऊन सायंकाळी ०७:३० वा. सुमारास घरी आला. त्याच दरम्याने प्रतिक्षा हिच्या वडीलांचे मित्र श्री चौधरी यांचा मुलगा संतोष चौधरी सध्या रा. कुडाळ पानबाजार हा त्यांच्या घरी आला.प्रतिक्षा हिच्या आईने संतोष चौधरी याना चहा दिल्यानंतर विकास व संतोष चौधरी हे घराचे बाहेर गेले. त्यानंतर ऋतिक परब हा घराच्या मागील पडवीत चिकन साफ करत होता. यादरम्यान रात्रौ ०८ वा. च्या सुमारास शेजारी राहणारी चुलत काकी शिवन्या कृष्णा वाळके विळी देण्यासाठी आली व यावेळी घराचे मागील पडवीत ऋतिक परब याच्याकडे विळी देत असताना घराचे मागील दरवाजाने संतोष चौधरी प्रतिक्षा हिच्या घराच्या पडवीत आला व त्याने ऋतिक याच्यावर कोयत्याने मानेवर मारहाण केल्याने ऋतीकने आरडाओरडा केली. त्यामुळे प्रतिक्षा व प्रतिक्षाची आई त्या दिशेने गेल्यावर संतोष चौधरी हातात कोयता घेऊन या दोघांच्याही दिशेने आला व त्याचे हातातील कोयता प्रतिक्षा हिच्या डोकीवर मागील बाजुस मारुन दुखापत केली. यावेळी आई पुढे आली असता संतोष चौधरी याने त्याचे हातातील कोयत्याने आईच्या डोकीवर तसेच डाव्या हातावर कोयत्याने मारुन दुखापत केली. त्याचवेळी आईला सोडवण्यासाठी चुलत काकी शिवन्या ही पुढे आली असता संतोष चौधरी याने त्याचे हातातील कोयत्याने चुलती शिवन्या हिचे डावे हातावर मारहाण करून दुखापत केली. ऋतिक परब यांचे मानेस, खांद्यावर व हाताची बोटे यांना गंभीर दुखापत झाल्याने तो रक्तबंबाळ झालेला होता. यानंतर हे चौघेजण रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आरडाओरडा करत घराचे समोरील दरवाजाने घराबाहेर येत पळत घराच्या समोरील रस्त्याचे दिशेने धावत गेले. संतोष चौधरी हा हातात कोयता घेऊन घराच्या मागच्या पडवीच्या दरवाजाने घराबाहेर गेला.

यावेळी या सर्वांनी आरडाओरडा केल्याने शेजारी राहणारे दिनेश “उमेश गावडे, सत्यवान गंगाराम माधव, मधुकर गंगाराम माधव व इतर लोक धावत आले. आणि सदर वेळी संतोष चौधरी हा आमचे घरासमोरुन त्याची मोटर सायकल घेऊन पळण्याचे तयारीत असताना त्याला दिनेश गावडे व त्यांचे सोबतच्या लोकांनी जागीच थांबवले. संतोष चौधरी याला या घरातील लोकांना कोयत्याने का मारहाण केली म्हणून जमलेल्या लोकांनी विचारले असता संतोष चौधरी याने सांगितेले की, प्रतिक्षा हिचे वडिल विलास नारायण वाळवे यांनी सन २०१४ सालात चौधरी यांच्याकडुन अडीच लाख रुपये घेतलेले होते. ते वारंवार मागुनही परत दिलेत नाहीत याचा त्याचे मनात राग असल्याने त्या रागातून त्याने घरी येऊन या घरातील लोकांना मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर तेथे जमलेल्या लोकांनी घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना कळविले. व या चौघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे व त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग ओरोस येथे दाखल केलेले आहे पैशाच्या देवघव व्यवहारावरून गोवेरी माधववाडी येथील चौघांना त्यांच्या हातातील कोयत्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी संतोष चौधरी याच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर हे करत आहेत. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर, पोलीस मंगेश शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यातील दोघांची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी संशयित संतोष चौधरी याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत


Spread the love

Related posts

राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेच्‍या कोल्‍हापूर जिल्‍ह्यात धाडी : तिघेजण कह्यात !

news

मुसलमान पोलीस हवालदाराकडून लव्ह जिहादद्वारे सहकारी महिलेची फसवणूक….

news

‘तरुणीला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत असलेल्या मोहम्मद फैजान खान गुन्हा दाखल…..

news

Leave a Comment