स्टोरी

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात केली महापूजा!

Spread the love

२९ जून वार्ता: आमच्या सरकारनं विविध योजना सुरु केल्या. महात्मा फुले योजनेंतर्ग पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा आपण निर्णय घेतला आहे. आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना हा दुसऱ्यांदा पूजेचा मान मिळाला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे उपस्थित होते. सलग दुसऱ्या वर्षी मला पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाला, मी खूप भाग्यवान समजतो, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. ते वारकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते.

आषाढी वारीला लाखोंच्या संख्येने लोक पायी चालत येत असतात. आज आपण पाहतो संपूर्ण पंढरपूर पांडुरंगमय झालंय, वारकरीमय झालंय. सगळीकडं पांडुरंगाचं नामस्मरण आपल्या ऐकाला मिळत आहे. पत्रकारांनी मला विचारलं तुम्ही पांडुरंगाकडं काय मागितलं? मी बळीराजाचं संकट दूर कर आणि चांगला पाऊस पडू दे, असं साकडं घातलं. आपल्या सरकारला वर्षपूर्ती होईल. पांडुरंगाच्या आशीर्वादानं सगळं सुरळीत सुरु आहे. मविआच्या काळात कामं थांबली होती, ती आता आम्ही पूर्ण करत आहोत. आमच्या सरकारनं विविध योजना सुरु केल्या. महात्मा फुले योजनेंतर्ग पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा आपण निर्णय घेतला आहे. १५ लाख वारकऱ्यांचा विमा देखील काढला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.


Spread the love

Related posts

कु.चैताली भरतराव कुटेमाटे यांची उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे सहाय्यक सहकार अधिकारी ह्या पदावर निवड…!

news

जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांना अटक करता येणार नाही!

news

आदिवासी तडवी भिल एकता मंचचा यावल प्रकल्प कार्यालयाला इशारा; मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण

newss

Leave a Comment