क्राईम

रिअल इस्टेट कंपनी सुपरटेकचे अध्यक्ष आर. के. अरोरा ‘ईडी’ च्या ताब्यात!

Spread the love

२८ जून वार्ता: रिअल इस्टेट कंपनी सुपरटेकचे अध्यक्ष आर. के. अरोरा यांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अंमलबजावणी संचालनालयाने २५ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांची किंमत ४०.३९ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. या मालमत्ता सुपरटेक ग्रुप ऑफ कंपनीज आणि त्यांच्या संचालकांच्या होत्या आणि या मालमत्ता उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये होत्या. ईडीने मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदीनुसार या मालमत्ता जप्त केल्या आहेत. दिल्ली पोलीस, हरियाणा पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडी ने आर. के. अरोरा यांना मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत अटक केली आहे.

ईडीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी आणि तिच्या संचालकांनी संभाव्य खरेदीदारांकडून बुक केलेल्या फ्लॅटसाठी आगाऊ रक्कम गोळा करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. संचालक या लोकांना वेळेत फ्लॅटचा ताबा देण्यात अपयशी ठरले आहेत. कंपनीने जनतेच्या पैशाची फसवणूक केली आहे. सुपरटेक लिमिटेड आणि ग्रुप कंपन्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले आणि बँका आणि वित्तीय संस्थांकडून विशिष्ट मुदतीचे कर्ज घेतले असे तपासात आढळून आले आहे. मात्र, या निधीचा दुरुपयोग करून इतर समूह कंपन्यांच्या नावे जमीन खरेदी करण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

किशोर आवारे खून प्रकरणी एक संशयित ताब्यात!

news

उज्जैनमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

news

मळगाव येथे किरकोळ करणावरून रिक्षा चालकाला मारहाण….

news

Leave a Comment