स्टोरी

म्हसळ्यातील अपघात फेम घोणसे घाटात टँकरला अपघात! चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाला आपघात.

Spread the love

म्हसळा प्रतिनिधी:(संजय खांबेटे):पुणे दिघी रस्त्यावरील अपघातासाठी प्रसीध्द असलेल्या घोणसे घाटांतील केळेवाडी परीसरांतील तीव्र वळणा पूर्वीच टँकर डावीकडे पलटी होऊन भिषण अपघात आज रवीवार दि २८ रोजी १.४५च्या दरम्यान झाला. टॅंकर क्रं MH 43 Y5727 हा रिलायन्स कंपनीतून 20 कि.ली. (20 हजार लिटर ) डिझेल घेऊन आदानी पोर्ट दिघी येथे जात असताना घोणसे घाटातील तीव्र उतारावर नियंत्रण न झाल्यामुळे भिषण अपघात झाला. अपघातात मनुष्यहानी झाली नसली तरी मोठया प्रमाणांत डिझेल वाहून गेल्यामुळे वित्तीय नुकसान झाले आसल्याचे सांगण्यांत आले.

पुणे दिघी F753 या राष्ट्रीय महामार्गा वरील घोणसे घाट परिसर  व अन्य माणगाव ते दिघी या मार्गावरील रस्ता सदोष आसल्याच्या तसेच घोणसे घाटांतील केळेवाडी परीसरांतील रस्त्याबाबत अनेक वाहन चालकानी तक्रारी करून सुद्धा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केले आहे.आजचा अपघात हा सुरक्षितता म्हणून केलेल्या रंम्लबल स्पिड ब्रेकर मुळे गाडींतील लिक्वीड जोरदार हिसळून अपघात झाला आसावा असे घाटांतून जाणारा अन्य टँकरचालक रणबीरसींग यानी सांगितले.अपघाताचे वृत्त कळताच स. पो.नि.संदीपान सोनावने आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचून सुरक्षितता पाहून अन्य वाहतुक सुरु केली.फोटो.


Spread the love

Related posts

यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांचा मुणगेत समाजोपयोगी उपक्रम!

news

मळगाव ब्राह्मणपाठ ग्रामीण मार्ग क्रमांक २४७ या रस्त्याचे नूतनीकरण कामाचा शुभारंभ !

news

सावंतवाडीत शौर्य दिननानिमित्त भिमा कोरेगावच्या शूरवीरांना मानवंदना…!

news

Leave a Comment