स्टोरी

म्हसळा गवळवाडी येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा २१ वा वर्धापन दिन साजरा

Spread the love

म्हसळा प्रतिनिधी: रायगड म्हसळा शहरात प्रतिपंढरपुर असलेल्या गवळवाडी येथे बाळमित्र ग्रामस्थ, मुंबई मंडळ, शिवांजली क्रिकेट संघ यांचे संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा २१ वा वर्धापनदिन सोहळा अत्यंत उत्साही व आंनदात साजरा केला.वर्धापन दिनाचे औचित्याने अभिषेक सोहळा, पालखी मिरवणूक, श्री सत्यनारायणाची महापुजा, महाआरती, महाप्रसाद, सांस्कृतीक कार्यक्रम, विद्यार्थी गुणगौरव आणि गावातील दानशूर व्यक्तींचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानीक ग्रामस्थ आणि शिवांजली क्रिकेट क्लबच्या कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. कला आणि क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थी वर्गाला शिक्षवृती रोख बक्षीस व भेट वस्तु देवुन सन्मानित करण्यात आले. वर्धापदिनानिमित्त गावातील बहुतांश सदस्यांनी मोठया प्रमाणात देणगी व अन्नदान केले. अनेक भाविक भक्तगणांनी देवदर्शन व पुजा प्रसादाचा लाभ घेतला.

आयोजित कार्यक्रमात शहराचे माजी नगराध्यक्ष, शिवकृपा पतसंस्था चेअरमन दिलीप कांबळे, गाव अध्यक्ष अशोक काते, माजी सभापती महादेव पाटील, गटनेते संजय कर्णिक, संजय खांबेटे, नगरसेविका राखी करंबे, सुजित काते, उदय कळस, श्रीकांत बीरवाडकर, सुशिल यादव, माजी नगरसेवक संतोष काते, माजी नगरसेविका सेजल खताते, म.या.चॅ.ट्रस्ट विश्वस्त प्रीत खताते महीला अध्यक्षा सुलोचना काते, संघटक प्रभाकार खताते, मंगेश महाडिक, संजय खताते, जेष्ठ कार्यकर्ते दशरथ काते, सुनिल दिवेकर, रामचंद्र खताते, शरद काते, सचिव प्रमोद काते, नितीन दर्गे, रुपेश खताते, प्रकाश कासार, महादेव रिकामे, सुभाष कासार, मंगेश खताते, मोहन कासार,राजेंद्र खताते, राकेश ठसाळ, अंकुश नटे, दुर्गेश खताते, परेश खताते, राजकीरण खताते, उदय चोगले, सुर्यकांत महाडिक, महादेव काते, प्रसाद चोगले, प्रसाद काते, शाम कासार, रामकृष्ण दर्गे, विजय खताते, संतोष, पंडित खेडेकर, निलेश घोले, संदीप काते,दत्ताराम दिवेकर, महिला मंडळ, विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन गवळवाडी गावाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी गावात एकता आणि वैभव प्राप्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

युवाईला विधायक संस्कार देणारे सर्वोत्तम व्यासपीठ राष्ट्रीय सेवा योजना…! – प्रा. रूपेश पाटील

news

NIA ने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना अटक करुन चौकशी करावी! आाचार्य तुषार भोसले

news

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कुडाळ येथे रॅली द्वारे महाआरतीचे आयोजन…!

news

Leave a Comment