स्टोरी

श्रद्धा वालकर हत्याकांड अपडेट्स

Spread the love

दिल्ली: आपल्या लिव-इन पार्टनर श्रद्धा वालकर हत्या आणि तिच्या शरीराचे तुकडे करणारा आरोपी आफताब अमील पूनावाला याच्या विरोधात मंगळवारी दिल्लीच्या साकेत कोर्टाने आरोप निश्चिती केली आहे. न्यायालयाने आफताबवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत कलम 302 (हत्या) आणि कलम 201 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. यापुढे आफताब पुनावालाला हत्येच्या आरोपाखाली सुनावणीला सामोरं जावं लागेल. साकेत कोर्टाने सांगितल्यानुसार, सर्व बाजू पाहता दिल्ली पोलिसांनी पुरेसे पुरावे सादर केले असून प्राथमिक पातळीवर आफताबविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुराव्यांअभावी आफताबची सुटका होण्याची चर्चा होत असताना ही मोठी अपडेट मानली जात आहे.


Spread the love

Related posts

मुंबईचे माजी नगरसेवक शैलेश परब यांना मातृशोक!

news

ओसरगाव प्रशालेत आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ…!

news

माजी खा.विनायक राऊत यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने करण्याचा नारायण राणेंना नैतिक अधिकार नाही- राजू कविटकर

news

Leave a Comment