स्टोरी

रेल्वेच्या धडकेत शैलेश मधुकर कुडाळकर या विवाहीत तरुणाचा मृत्यू

Spread the love

वैभववाडी प्रतिनिधी: रेल्वेच्या धडकेत शैलेश मधुकर कुडाळकर वय ४५ रा.कणकवली हरिप्रीया आपार्टमेंट परबवाडी या विवाहीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याने आत्महत्या केली असावी. असा अदांज व्यक्त केला जात आहे. ही घटना गुरुवारी दुपारी वैभववाडी रेल्वे स्टेशन नजीक घडली आहे. याबाबत रेल्वे पोलिस विपुल विश्वर म्हस्के यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

मुंबईवरुन मडगावच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सेप्रेसच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहीती वैभववाडी पोलिसांना मिळताच वैभववाडी पोलिस निरीक्षक एस.एस.खंडागळे, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पो.काॕ.श्री.तळस्कर, अभिजीत तावडे हे घटनास्थळी दाखल झाले. वैभववाडी रेल्वे स्टेशनपासुन राजापूरच्या दिशेला ४०० मिटर अंतरावर रेल्वे रुळावर छन्नविच्छन अवस्थेत शैलेशचा मृतदेह पडला होता. मृतदेहाच्या बाजूला त्याचे पाकीट व मोबाईल पडलेला होता. पाकीटातील कागदपञावर असलेल्या नाव व पत्त्यावरुन पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. दरम्यान शैलेशच्या मोबाईलवर त्याच्या मिञाचा फोन आला. त्यालाही पोलिसांनी याबाबत माहीती दिली. तासभरानंतर मयत शैलेश चा भाऊ संतोष कुडाळकर हे घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह शैलेश कुडाळकरचाच असल्याची ओळख पटविली. मयत शैलेश कुडाळकर हा सकाळी कणकवली येथून दिवा गाडीने वैभववाडी रेल्वे स्थानकात आला होता. त्याचा रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली याचा तपास सुरु आहे.

मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यातआला.मयत शैलेश कणकवली शहरात एका सुवर्णकाराकडे काम करीत होता. स्वभावाने मनमिळावू, शांत, मितभाषी होता. त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच कणकवली शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, विवाहीत बहीण असा परिवार आहे.


Spread the love

Related posts

हिंदु संत आणि संप्रदाय यांची बदनामी करणार्‍या ’महाराज’ चित्रपटावर तत्काळ बंदी घाला !

news

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पावशी व समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन!

news

छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी वास्को येथील एका ख्रिस्त्याला अटक!

news

Leave a Comment