स्टोरी

आजगांव ते तिरोडा मार्गे ते शिरोडा कडे जाणा-या रस्त्याचे दुरुस्ती व साकव दुरुस्ती तात्काळ करा!

Spread the love

शिरोडा प्रतिनिधी:(दिनेश शांताराम मयेकर): आजगांव ते तिरोडा मार्गे ते शिरोडा कडे जाणा-या रस्त्यावरून तिरोडा, नाणोस, गुळदुवे आजगांव ( हरिजनवाडी ) , आरोंदा व पंचक्रोशीतील जनतेची ये-जा असते.शिरोड्याला ( ता.वेंगुर्ला ) मोठी बाजारपेठ असल्याने वरील सर्व गावांतील जनता बाजारहाट करण्यासाठी या रस्त्यावरून जात असतात.सदर रस्ता व साकव ( पूल ) पूर्णपणे नादुरूस्त असून जाणे-येणे मुश्कील झाले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या रस्त्यावरून शाळेत जाणारी मुले व जनता चालत, सायकलने जात असतात. अशावेळी अनंत अडचणी निर्माण होतात. पावसाळ्यात रस्त्यावर खड्ड्यात पाणी साचल्याने चालत जाणा-यांच्या अंगावर पाणी उडते. शिरोडा शाळेत जाणारी पाचवीपासून – बारावी पर्यतची सर्व मुले याच रस्त्याने जातात. जात असताना सायकलवरून पडलेल्यांची अनेक उदाहरणे आहेत. सदर रस्ता व साकव (पूल) येत्या ८-१० दिवसांत दुरूस्त न झाल्यास तिरोडा , नाणोस , गुळदुवे , आजगांव (हरिजनवाडी) येथील गावांतील जनतेमार्फत ” रस्ता रोको आंदोलन ” केले जाईल. असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश शांताराम मयेकर यांनी दिला आहे.


Spread the love

Related posts

सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याचं प्रतिबिंब “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहात दिसत आहे..! प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे

प्रसाद परब

सगळे एकत्र आलो हेच सावंतवाडीतले “रामराज्य”…!

news

मालवण केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत दांडी येथील सौ.निर्झरा जोशी प्रथम!

news

Leave a Comment